श्री लक्ष्मीनारायण मंदिर कोपऱ्यातील चायनीज हॉटेल त्वरित हटवा,मंदिर प्रशासनासह,नागरिक, व्यापाऱ्याची निवेदन देऊन मागणी उदगीर:- येथील जागृती टाकीज ते लक्ष्मीनारायण मंदिर रस्त्याच्या कोपऱ्यावर काही दिवसापूर्वी चायनीज हॉटेल लावले असून येथून दररोज हजारो भक्त श्री लक्ष्मीनारायण मंदिरात येतात त्याच सोबत या हॉटेल मधे जे काही बनवले जाते त्याच्या वासाने तेथील व्यापारी फार परेशान आहेत येथील हॉटेल त्वरित येथून हटवावे अश्या आशयाचे निवेदन श्री लक्ष्मीनारायण मंदिर संस्थे चे पदाधिकारी व या भागातील व्यापारी व 55 नागरिकांच्या सह्याचे निवेदन नगर परिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांना देण्यात आले असून आता मुख्याधिकारी यावर काय भूमिका घेतात हे पहावे लागेल
Popular posts
पंचायत समिती उदगीर येथे राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा . उदगीर=पंचायत समिती उदगीर येथे दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा पशुधन अधिकारी श्री.भुपेंद्र बोधनकर,हे होते तर प्रमुख पाहूने म्हणून गटविकास अधिकारी श्री. प्रविण सुरडकर, कृषी अधिकारी श्री. बालाजी केदासे,तालूका पशुधन अधिकारी श्री. घोणषीकर हे होते. या प्रसंगी प्रशासनाकडून उल्लेखनीय कार्य केलेल्या ग्रामपंचायत अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला ते ग्रामपंचायत बामणीस सन 2024/25 चा स्मार्ट ग्राम स्पर्धेत उदगीर तालुक्यात प्रथम क्रमांक व माझी वसुंधरा अभियानात विभागात दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी संजय गुरमे , व स्मार्ट ग्राम स्पर्धा सन 2023- 24 नळगीर ग्रामपंचायत प्रथम क्रमांक व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात विभागात दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी बि . के कांबळे, तसेच सन 2022-23 चा स्मार्ट ग्राम स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक ग्रामपंचायत अधिकारी श्री. वैजनाथ मोरतळे तर , विशेष कर वसूलीत तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी श्री. शरद जाधव व राष्ट्रीय पशुधन गणना व बर्ड फ्लू च्या साथीचे नियोजन वेळेत केल्याने पशुधन अधिकारी श्री. घोणषीकर या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक विस्तार अधिकारी श्री. अंकुश बिरादार केले तर मार्गदर्शन गटविकास अधिकारी श्री . प्रविण सुरडकर , कृषी अधिकारी श्री बालाजी केदासे व शासनाच्या शंभर कलमी कार्यक्रमावर श्री. बोधनकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बि. के कांबळे यांनी केले तर आभार पंचायत विस्तार अधिकारी श्री. दंडे यानी मानले. यावेळी पंचायत समितीतीचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
Image
बीदर जिल्हा मराठी पञकार परिषदेच्या अध्यक्षपदी दयानंद बिरादार तर सचिव पदी दत्तात्रय साबणे यांची निवड उदगीर:-अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार शनिवारी (दि.५) भालकी जि. बीदर येथे जनार्धन बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली पञकाराची बैठक संपन्न झाली. या बैठकीत परिषदेचे चिटणीस सचिन शिवशेट्टे यांनी बीदर जिल्हा मराठी पञकार परिषदेची कार्यकारणी जाहीर केली. यात अध्यक्षपदी दयानंद बिरादार, कार्याध्यक्ष तुकाराम मोरे, उपाध्यक्ष दत्तात्रय स्वामी, सचिव दत्ताञय साबने, सहसचिव प्रा. सौ. मिनाक्षीताई पाटील, कोषाध्यक्ष मन्मथ स्वामी कार्यकरिणी सदस्य म्हणून अंकुश वाडीकर, विद्यासागर पाटील, महेश हुलसूरकर, तुकाराम शेडोळे, विनायक शिंदे सल्लागार सदस्य म्हणून माधव पिचारे, पी.आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारणीची निवड झाल्याबद्दल मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख सह उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.. येत्या कार्यकाळात जास्तीत जास्त पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली येतील आणि पत्रकारांचे प्रश्न आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा श्री.एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
Image
पत्रकार दत्ता पाटील यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी हनुमंत घोणसे वर गुन्हा दाखल उदगीर: देवणी येथील दै. देशोन्नती चे तालुका प्रतिनिधि दत्ता पाटील रा.तळेगाव ता.देवणी यांना दारूची बातमी छापल्याचा कारणा वरून जिवे मारण्याची धमकी देण्यात होती या प्रकरणी पत्रकार सौरक्षण कायद्यानुसार देवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतीत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की गेल्या आठवड्यात देवणी तालुक्यातील अवैध देशी दारू जप्त केल्याची बातमी दैं. देशन्नती या दैनिकात प्रकाशित झाली होती. याचा राग मनात धरून माझ्या मुलाची बदनामी करतो का म्हणुन आर्वाच भाषेत शिवागाळ करत परिवारास जिवे मारण्याची धमकी हनुमंत रंगराव घोणसे यांनी पत्रकार दत्ता पाटील यांना दिली होती,या प्रकरणी देवणी पोलिसात पत्रकार दत्ता पाटील यांनी तक्रार दाखल करताच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार हनुमंत रंगराव घोणसे रा. तळेगाव ता. देवणी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या बाबतचा अधिक तपास पोलीस उपअधिक्षक याच्या कडून करण्यात येत आहे.या धमकीचा उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने सर्वात पहले निषेध नोंदवला होता.
उदगीर मतदार संघात जलजीवन कामाचा बट्ट्याबोळ:- माजी आमदार सुधाकर भालेराव 👉 करोडो रुपये खर्च होऊन ही जनता एक एक थेंब पाण्यासाठी परेश्यान 👉 उदगीर मतदार संघात भ्रष्टाचाराने गाठला कळस :- सुधाकर भालेराव उदगीर :- उदगीर जळकोट तालुक्यात पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील योजना म्हणजे प्रत्येक घरी पाणी पूर्ण करण्यासाठी येथे जलजीवन योजना राबविली गेली पण गुत्तेदारानी ,अधिकाऱ्यांनी ही योजना जुन्या पाईप लाइन ला नवीन दाखवून तर कुठे निकृष्ट काम करून आपले घर भरून घेतले असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे माजी आमदार तथा शरद पवार गटाचे नेते माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले उदगीर तालुक्यातील 108 गावात जलजीवन योजना मंजूर झाली त्या पैकी 66 गावात ही योजना पूर्ण झाली असून अनेक गावात या योजनेत भ्रष्टाचार झाला असून काही गावात तर जुनी पाईप लाइन नवीन दाखवून बिल उचलले असून ही योजना म्हणजे गुत्तेदार,अधिकारी यांचे घरभरन्यायासाठी राबवली का हा प्रश्न उपस्थित होत आहे कारण की या योजने वर करोडो रुपये खर्च होऊन ही जनतेला एक एक थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, उदगीर कराना दररोज शुद्ध पाणी मिळावे म्हणून मी माझ्या काळात करोडो रुपये खर्च करून लिंबोटी हून पाणी आणले पण नाकाम अधिकाऱ्यांमुळे आज उदगीरकराना 8,9 दिवसास पाणी मिळत आहे यांनी तिजोरी भरण्यासाठी 1500 रू ची पाणीपट्टी 3000 रु केली आता आम्ही हे सहन करणार नसून लवकरच आम्ही रस्त्यावर उतरून गुत्तेदाराचे ,अधिकाऱ्याचे पितळ उघडे पाडू असे ही ते म्हणाले,या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गट शहरअध्यक्ष अझीम दायमी सह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या
Image
उदगीर विधिज्ञ संघाच्या निवडणूकीत सर्वसमावेशक समतावादी पॅनलचा दणदणीत विजय... अध्यक्षपदी आनंद मुंढे तर उपाध्यक्षपदी गितानंद अक्कनगीरे उदगीर : उदगीर तालुका विधिज्ञ वकील संघाच्या पदाधिकारी निवड २०२५ - २६ साठी २८ मार्च रोजी झालेल्या निवडणूकीत सर्वसमावेशक समतावादी पॅनलचा दनदतीत विजय झाला आसून तालुका विधिज्ञ संघाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष आणि ग्रंथालय सचिव या पदावर उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत तर विधिज्ञ विकास पॅनला सचिव पदावर आपला शिक्कामोर्तब करता आला तर सहसचिव पदावर अपक्ष उमेदवाराने विजय खेचून आणला. चुरशीच्या झालेल्या या अटीतटीच्या निवडणूकीत सर्वसमावेशक समतावादी पॅनलचे उदगीर विधिज्ञ संघाच्या अध्यक्षपदी ॲड .आनंद पंढरीनाथ मुंढे तर उपाध्यक्षपदी ॲड .गितानंद गोविंदराव अक्कनगिरे हे निवडून आले आहेत. विजयी उमेदवार पुढील पुढील प्रमाणे विजयी उमेदवार ॲड. आनंद पंढरीनाथ मुंढे (अध्यक्ष), ॲड .गितानंद गोविंदराव अक्कनगिरे (उपाध्यक्ष), ॲड . चंद्रशेखर वामनराव भोसले (सचिव), ॲड . शरदचंद्र शेषराव पाटील (सहसचिव), ॲड . विजयकुमार सुभाष पाटील माने (कोषाध्यक्ष), ॲड . अमोल तुकाराम कळसे (ग्रंथालय सचिव) या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला तर तत्पूर्वीच ॲड संतोषीमाता मारुती सुर्यवंशी (महिला उपाध्यक्षपदी), ॲड .अश्लेषा चंद्रकांत बिरादार (महिला सहसचिव), ॲड .वर्षा पंकज कांबळे (महिला प्रतिनिधी) हे बिनविरोध निवडून आले आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड . महेश माशाळकर यांनी काम पाहीले तर सहाय्यक म्हणून ॲड . संदीप भांगे यांनी सहकार्य केले. विजयी उमेदवारांचा सत्कार जेष्ठ विधिज्ञ ॲड . गुलाब आण्णा पटवारी, ॲड .एस . टी पाटील , ॲड ' भरत. एम . गुंडरे , ॲड . बालाजी पाटील , ॲड . एस . बी पाटील ' ॲड .बाळासाहेब नवटक्के, ॲड . तानाजी केंद्रे , ॲड . सोपनराव धोंड ,ॲड . तोबरे , ॲड . बी एन बोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
Image