हागणदारी मुक्त हंचनाल गाव कागदावर,अर्धे गाव सकाळी रस्त्यावर! 👉 सरपंच, ग्रामपंचायत सदस्या समोर लोक खुलेआम जात आहेत उघड्यावर शौचास 👉 पंचायत समिती देवणी येथील गटविकास अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी उदगीर:- देवणी तालुक्यातील हांचनाल गाव 100% हागणदारी मुक्त झाल्याचे सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले,प्रत्येक घरात शौचालय असून ही अर्धे गाव सकाळी गावचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्या समोरच शौचास आजू बाजूच्या शेतात,रस्त्यावर जात असून एवढेच नाही तर शौचास जातात आणि येतेवेळेस शेतातून जे हाताला लागते ते उचलून घेऊन जात आहेत,या लोकांना ग्रामपंचायत सदस्या सह सरपंचाचा ही पाठिंबा आहे का हा प्रश्न आजू बाजूच्या शेतकऱ्यांना पडत असून,मागील काळात अशा बाहेर रस्त्यावर शेतात शौच करणाऱ्यावर देवणी पंचायत समिती ने पथक नेमून कार्यवाही केली होती पण मागील 4,5 वर्षा पासून हे पथक गायब असल्याने ह्या लोकांचे फावत असून घरात शौचालय असून ही बाहेर शौचास जाणाऱ्या अशा मूर्ख लोकावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे
Popular posts
HSRP नंबर प्लेट साठी कोणास ही जास्त पैसे न देता स्वतः करा दाखल:- सहाय्यक परिवहन अधिकारी सुनील शिंदे 👉 अनेक दलाल जास्त पैसे घेत असल्याची चर्चा उदगीर:- मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र (https://transport.maharashtra.gov.in) यांनी दि. ०४ डिसेंबर २०२४ रोजी अध्यादेश काढून महाराष्ट्रातील जुन्या/नव्या सर्वच वाहनांना HSRP (High Security Registration Plate) बंधनकारक केली आहे. ३१ मार्च २०२५ ही शेवटची तारीख आहे. मात्र इतका महत्वाचा निर्णय असूनही सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती आणखी पोहचली नसून जनसामान्यांना पोहोचवण्यासाठी प्रयत्न होणे जरुरी आहे मुदत संपल्यावर मात्र म्हणजे १ एप्रिल २०२५ पासून हेच इ-चलान मशीन घेऊन फौज रस्त्यावर उतरवतील आणि धडाधड चलान मारतील! त्यांना HSRP चे चलान फाडण्याची संधी देऊ नका. मुदतीपूर्वीच आपापल्या गाड्यांना HSRP बसवून घ्यावे असे आवाहन उदगीर येथील सहायक परिवहन अधिकारी सुनील शिंदे यांनी केले आहे ,पण काही दलाल या नंबर प्लेट साठी अवाजवी रक्कम घेत असल्याचे समजत असून कोणीही जास्त रक्कम न देता स्वतः दाखल करावे असे ही आवाहन त्यांनी केले आहे शासन आदेश पाहण्यासाठी:- https://transport.maharashtra.gov.in/Site/Upload/GR/HSRP-SOP-13122024.pdf HSRP बुक करण्यासाठी भेट द्या :- https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html अधिक माहितीसाठी video : https://www.youtube.com/watch?v=mna7XdZCoQc https://www.youtube.com/watch?v=M5J5OC_owr4 https://www.youtube.com/watch?v=N5H5fFUCigs
अल्पसंख्यांक समाजाच्या विविध विकास योजना अल्पसंख्यांक घटका पर्यंत पोहचऊन विकासाला गती द्यावी:- जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ललित गांधी 👉ललित गांधी यांनी घेतला अल्पसंख्याक विकास योजनांचा आढावा 👉 जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन उदगीर : जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. तसेच या योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तीला देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी सोमनाथ रेड्डी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, माध्यमिकाचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिकाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता संजय सावंत, पुरणमल लाहोटी शासकीय यंत्र निकेतनचे प्राचार्य नितीन नितनवरे, नितीन आगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ समाजातील अल्पसंख्याक घटकांपर्यंत पोहचवून त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करावा, असे श्री. गांधी यावेळी म्हणाले. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य करते. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह लातूर येथे कार्यान्वित आहे. या वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी जास्तीत जास्त मुलींना प्रोत्साहित करावे, असे श्री. गांधी यांनी सांगितले. *जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय* जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे लातूर जिल्हा कार्यालय लातूर येथील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते झाले. जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यावेळी उपस्थितीत होते.
Image
झाली निवडणूक,उदगीरात आता प्रीपेड मीटर बसवण्यास सुरूवात उदगीर:- विधानसभेची निवडणूक पार पडताच उदगीरात प्रीपेड लाईट मीटर बसवणे सुरू झाले असून आता विद्युत ग्राहकांना मोबाईल सारखे पहले रिचार्ज मारूनच वीज घ्यावी लागणार आहे, उदगीर शहरात आता प्रीपेड मीटर बसवण्यास सुरुवात झाली आहे
Image
हनुमानाचे जागृत देवस्थान श्री क्षेत्र चाळकापुर:- (उपसंपादक) विधीज्ञ गोविंदा सोनी :- नवसाला पावणारे मंदिर म्हणून बारा महीने गर्दी :- विविध रुपे घेणारे अशेच श्री हनुमान जागृत देवस्थान वसलेले आहे ते कर्नाटक राज्यात  भालकी तालुक्यातील चालकापुर या ठिकाणी,भाविक नावसाला पावणारे मंदिर म्हणून बारा महीने गर्दी करतात,या मंदिरात सकाळी श्री हनुमानाचे बाल रूप दुपारच्या सुमारास युवक रूप व सायंकाळी वृद्ध रूप असे दर्शन या ठिकाणी मिळत असल्याचे भाविक आख्यायिका सांगतात महाराष्ट्रातुन गोदावरी ही नदी कर्नाटकात जाते सदर नदी ही चालकापुर जवळ असलेल्या नारंजा नदीला जोडते, याच ठिकाणी श्री हनुमानाचे भव्य मंदिर आहे,बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यात चालकापुर हे गाव आहे,सदर गाव छोटेसे असून गाव फारच सुंदर आहे,या गावाला एक वेगळा इतिहास आहे,या गावालगत एक नदी असून तिचे नाव नारांचा नदी आहे,सदर नदी ही गोदावरी नदी सोबत जोडली जाते,चालका हे एका देवीचे नाव आहे जी सदा पर्वतावर राहते, जे की चालकापुर जवळ आहे या पर्वताला संजीवनी पर्वत म्हणून संबोधले जाते,याच गावात श्रीरामाचे व हनुमानाचे भव्य मंदिर आहे चालका देवीचे सदैव वास्तव्य या ठिकाणी असल्याने या गावाला चालकापुर हे नाव पढले, या ठिकाणी विविध रुपे धारण करणारे श्री हनुमानाचे मंदिर असल्याने या गावाला एक इतिहास आहे,या ठिकाणी हनुमानाचे विविध रूपाचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर मुक्कामी असतात :- 👉 सकाळच्या सुमारास मंदिरात हनुमानाचे बाल रूप, दुपारी युवक रूप व सायंकाळी वृद्ध रूप पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात,या ठिकाणी वर्ष्यातुन दोन वेळा जत्रा भरते,या मंदिरात प्रतिदिन कुंकुमपूजा,अलंकारपूजा व गंधअलंकारपूजा न चुकता होत असते 👉भालकी तालुक्यातील चाळकापुर या ठिकाणी श्री हनुमान जयंती निमित्त भाविकाची तोबा गर्दी असते,नावसाला पावणारे श्री हनुमान मंदिर म्हणून भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ये जा करतात,या मंदिर शेजारी संजीवनी पर्वत असल्याने ज्या वेळेस रामायणात लक्ष्मनाला युद्धा प्रसंगी लक्ष्मन शक्ति लागते त्यावेळी संजीवनी पर्वतावरुन संजीवनी ही वनस्पति श्री हनुमानाचे अनली असल्याचे सुद्धा या ठिकाणी इतिहासात नमूद असून या पर्वतावर हनुमानाचे पद ही उटल्याचे आज ही पहावयास मिळते, चालकापुर हे गाव पर्वत रांगेत व निसर्गरम्य असल्याने या ठिकाणी पर्यटक निसर्गाचा अनमोल नजराना पाहण्यासाठी व श्री हनुमानाचे दर्शन ही घेण्यास गर्दी करतात
Image