कृषी उत्पन्न बाजार समितीस सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर ,बाजार समितीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी - शिवाजीराव हुडे उदगीर = उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची होणारी सोयाबीन खरेदी विक्रीच्या संदर्भातली अडचण विचारात घेऊन, सोयाबीन खरेदी केंद्र आपल्याकडे मिळावे. अशी मागणी पणन महामंडळाकडे केली होती. लोक कल्याणकारी योजनेचा भाग म्हणून पणन महामंडळाकडून उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी दिली आहे. मंजुरीचे अधिकृत पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाले असून त्या पत्रानुसार सोयाबीन खरेदी केंद्र उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या सोयाबीनच्या नोंदी करून घ्याव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीला सक्रिय होऊन काम करता येईल
• श्रीनिवास मदनलाल सोनी